नागरी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपावर चर्चा सुरू झाली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ‘ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. जिथे मित्र पक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे स्वतंत्रपणे निवडणूक लढवून निकालानंतर एकत्र येण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महायुती म्हणूनच निवडणूक लढवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. दुसरीकडे, मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री, संपर्कमंत्री आणि स्थानिक आमदार-खासदार यांच्यात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी बैठका सुरू आहेत. या सर्व बैठकांचे अहवाल राज्य समन्वय समितीसमोर ठेवले जातील, असेही ते म्हणाले.
आणखी पाहा







