घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला अन् ११ लाखांचा मुद्देमाल केला लंपास; अंबड शहरातील घटना

घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला अन् ११ लाखांचा मुद्देमाल केला लंपास

अंबड / जालना कव्हरेज न्यूज: शहरातील शमीम कॉलनी, ओमशांती महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून ११ लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

२५ जून २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली. सय्यद नसीर अब्बास बागवान यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. त्यांनी घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम चोरली. चोरीला गेलेल्या मालामध्ये १.५ लाख रुपये किमतीचा तीन तोळ्यांचा सोन्याचा राणी हार, २ लाख रुपये किमतीचे चार तोळ्यांचे दोन सोन्याचे गोठ, ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र, प्रत्येकी १ लाख रुपये किमतीच्या चार सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम), ७५ हजार रुपये किमतीचे दीड तोळ्यांचे सोन्याचे झुंबर, ७५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन आणि पेंडंट, १५ हजार रुपये किमतीचे २० तोळ्यांचे चांदीचे दोन पायघोळ आणि ३ हजार रुपये किमतीच्या एक तोळा चांदीच्या तीन अंगठ्यांचा समावेश आहे. याशिवाय, ४ लाख २० हजार रुपये रोख रक्कमही चोरट्यांनी लंपास केली. एकूण ११ लाख १३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.

संतापजनक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला लावलं ॲसिड; गर्भवती महिला ओरडू लागल्याने… भोकरदन मधील प्रकार!

या घटनेची तक्रार सय्यद नसीर अब्बास बागवान यांनी अंबड पोलीस ठाण्यात नोंदवली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपासाला सुरुवात झाली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक संतोष घोडके आणि सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. यावेळी डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक व्हॅन पथकानेही घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अमोल गुरले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!