येवता येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी योगेश दळवी तर उपाध्यक्ष पदी छगन दळवी यांची बिनविरोध निवड

येवता येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी योगेश दळवी तर उपाध्यक्ष पदी छगन दळवी यांची बिनविरोध निवड

येवता/जालना कव्हरेज न्यूज: येवता येथील प्राथमिक शाळेत आज शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीसाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण हक्क अधिनियम २००९ अंतर्गत या सभेत पालकांमधून समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित पालक, शिक्षक आणि गावातील मान्यवरांनी एकत्र येऊन नवीन समितीच्या निवडीला अंतिम स्वरूप दिले.

या निवड प्रक्रियेत योगेश देविदास दळवी यांची अध्यक्षपदी, तर छगन बाजीराव दळवी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. याशिवाय, शालिनी अमोल चौतमोल, हबीब सांडूखा पठाण, भगवान एकनाथ सपकाळ, दिगंबर रामराव राऊत, सत्यभामा धनंजय कड, एकनाथ साहेबराव दळवी आणि सईदा फिरोज शेख यांची समितीच्या सदस्यपदी निवड झाली. शिक्षण तज्ज्ञ म्हणून निवृत्त केंद्रप्रमुख भगवान अंबादास दळवी यांची निवड करण्यात आली.

पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना मिळणार 15,000 रुपये; केंद्र सरकारचा मोठा निर्णय: ELI योजनेला मंजुरी, दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्यांचे लक्ष्य

सभेच्या सुरुवातीला प्रदीप साडू यांनी प्रास्ताविक केले आणि निवड प्रक्रियेचे महत्त्व विशद केले. बबन जंजाळ यांनी निवड प्रक्रियेची संपूर्ण माहिती उपस्थितांना समजावून सांगितली. सभेचे आभार प्रदर्शन रामेश्वर पवार यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक विलास नवले, शिक्षक संजय मोरे, श्रीकांत माळेकर, विष्णू इंगळे यांच्यासह माजी अध्यक्ष सावजी दळवी, दगडू शिरसाठ, शब्बीरखा पठाण, दीपक दळवी आणि इतर पालक उपस्थित होते.

“आता मागे हटायचे नाही, विजय मिळवायचा आणि तोपर्यंत मुंबईतून परत फिरायचे नाही,”: मनोज जरांगे पाटील

नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती ही येवता गावातील प्राथमिक शाळेच्या शैक्षणिक विकासासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. खालीलप्रमाणे समितीची रचना आहे:

पदनाव
अध्यक्षयोगेश देविदास दळवी
उपाध्यक्षछगन बाजीराव दळवी
सदस्यशालिनी अमोल चौतमोल
सदस्यहबीब सांडूखा पठाण
सदस्यभगवान एकनाथ सपकाळ
सदस्यदिगंबर रामराव राऊत
सदस्यसत्यभामा धनंजय कड
सदस्यएकनाथ साहेबराव दळवी
सदस्यशायदा फिरोज शेख
शिक्षण तज्ज्ञभगवान अंबादास दळवी

नवनिर्वाचित समितीच्या सर्व सदस्यांचे गावकऱ्यांनी आणि पालकांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. ही समिती शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “येवता येथे शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड; अध्यक्षपदी योगेश दळवी तर उपाध्यक्ष पदी छगन दळवी यांची बिनविरोध निवड”

Leave a Comment

WhatsApp Join Group!