काकाच्या घरी लग्नासाठी गेल्या होत्या; नदीत बुडून दोन चुलत बहिणींचा दुर्दैवी मृत्यू!

पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्यूज): अमडापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी नदीत बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. मृतांमध्ये राजनंदीनी निंबाजी नाटेकर (वय १०, रा. बीबी) आणि तिची चुलत बहिण वैष्णवी महादेव खंडारे (वय १७, रा. कवळा, ता. चिखली) यांचा समावेश आहे.राजनंदीनी ही इयत्ता पाचवीत शिक्षण घेत होती. ती नायगाव येथे आपल्या काकाच्या घरी लग्नासाठी गेली होती. आज दुपारी सुमारे दीड ते दोन वाजताच्या दरम्यान, राजनंदीनी आणि वैष्णवी या दोघी कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेल्या.

मात्र कपडे धुण्याच्या दरम्यान अचानक पाण्यात घसरून दोघीही नदीत बुडाल्या आणि त्यांचा करुण अंत झाला. घटनेनंतर त्यांचे मृतदेह चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “काकाच्या घरी लग्नासाठी गेल्या होत्या; नदीत बुडून दोन चुलत बहिणींचा दुर्दैवी मृत्यू!”

Leave a Comment