जिल्ह्यात चार ठिकाणी पोलीस निरीक्षकांच्या बदल्या! कोणाची कुठे झाली बदली… वाचा बातमी

बुलढाणा पोलिस अधीक्षकपदाचा तिढा कायम? नीलेश तांबे की विश्व पानसरे?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार, प्रशासनिक कारणास्तव जिल्हा पोलीस दलात चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांनुसार, बोरखेडी, नांदुरा, खामगाव ग्रामीण आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यांसाठी नवे ठाणेदार नियुक्त करण्यात आले आहेत.

बोरखेडी पोलीस ठाण्याचे माजी ठाणेदार सारंग नवलकर यांची नंदुरबार येथे बदली झाल्यानंतर हे पद काही दिवस रिक्त होते. आता या ठिकाणी पोलीस निरीक्षक सिताराम मेहेत्रे यांनी २२ जून रोजी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारला आहे.

इतर बदल्यांमध्ये:

  • नांदुरा पोलीस ठाण्याचे नवे ठाणेदार जयवंत सातव
  • खामगाव ग्रामीणचे ठाणेदार किशोर तावडे
  • मलकापूर ग्रामीणचे ठाणेदार सतीश महल्ले

या बदल्या २१ जून रोजी जिल्हा नियंत्रण कक्षामार्फत अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या. नवीन नियुक्त्यांमुळे संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये कार्यक्षमतेत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment