चिखली तालुक्यात ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी आरक्षण जाहीर; गावागावात राजकीय हालचालींना वेग! वाचा बातमी….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
चिखली तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी पंचवार्षिक (२०२५-२०३०) कालावधीसाठी ९ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चिखली येथील तहसील कार्यालयात सभा पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी शरद पाटील होते. नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, स्थानिक नेते व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

. जाहिरात ☝️

यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी (नागरिकांचा मागास प्रवर्ग) आणि सर्वसाधारण प्रवर्ग यांच्यासाठी सरपंच पदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये महिलांसाठी स्वतंत्र आरक्षणाचा समावेश आहे. गावागावांमध्ये या आरक्षणामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून नव्या समीकरणांची तयारी सुरू झाली आहे.

आरक्षणानुसार गावांची यादी पुढीलप्रमाणे आहे:

अनुसूचित जाती (SC):
बोरगाव वसु, पाटोदा, अंत्री खेडेकर, रान अंत्री, कोनड, खोर, मालगणी, वरखेड, कवठळ, नायगाव खु.

अनुसूचित जाती (SC महिला):
करणखेड, गुंजाळा, धानोरी, पांढरदेव, येवता, चंदनपूर, गांगलगाव, हातणी, नायगाव बु., ब्रम्हपुरी, सावंगी गवळी

अनुसूचित जमाती (ST):
केळवद

अनुसूचित जमाती (ST महिला):
टाकरखेड हेलगा, दिवठाणा

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC):
सवणा, थोत्रा नाईक, साकेगाव, सावरगाव डुकरे, मुंगसरी, गोदरी, दहिगाव, खंडाळा मकरध्वज, उदयनगर, सोमठाणा, हरणी, भानखेड, किन्ही नाईक

नागरिकांचा मागास प्रवर्ग (OBC महिला):
डोंगरगाव, मलगी, आमखेड, शेलूद, तेल्हारा, किन्ही सवडत, इसोली, वैरागड, शेलोडी, मंगरुळ नवघरे, किन्होळा, अमडापूर, थोत्रा भनगोजी, सोनेवाडी

सर्वसाधारण प्रवर्ग (Open):
शेलगाव जहाँगीर, पेठ, शिंदी हराळीवळती, महीमळ, देऊळघाट धनगर, भरोसा, मोहदरी, भालगाव, मिसाळवाडी, चांधई, मेरा बु., कव्हळ, भोरसा-भोरसी, सातगाव भुसारी, काटोडा, टाकरखेड मु., पळसखेड दौलत, भोकर, मनुबाई, उत्रादा, करतवाडी, मुरादपूर, तोरणवाडा

सर्वसाधारण (महिला):
बोरगाव काकडे, एकलार, डोंगर शेवली, पिंपरखेड, आंधई, भोगावती, करवंड, शेलगाव आटोळ, खैरव, अमोना, रोहडा, अंत्री कोळी, अंबाशी, डासाळा, इसरूळ, माळशेंबा, मंगरुळ (इ.), बेराळा, कोलारा, मेरा खुर्द, धोडप, अंचरवाडी, शेलसूर, आसोला बु.


आरक्षण जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून गावागावात “कोण उभा राहणार?”, “सत्ता कोणाच्या हातात जाणार?” यावर चर्चा सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी नव्या चेहऱ्यांची चर्चा सुरू झाली असून, आगामी ग्रामपंचायत निवडणूक ही चिखली तालुक्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment