निर्णय खा मुकुल वासनिक घेणार की माजी आमदार राहुल बोंद्रे !
चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) — चिखली शहरात आता नगर पालिकेचा निवडणूक आरक्षण सोडत झाल्यामुळे आता अनेकाना नगराध्यक्ष पदासाठी स्वप्न पडत आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना न्यायालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता शासन व प्रशासन स्तरावर निवडणूक तयारीला गती आली आहे. चिखली नगराध्यक्षपद हे यावेळी सर्वसाधारण गटासाठी खुले राहिल्याने, सत्तारूढ भाजपसोबतच विरोधी काँग्रेसमध्येही हालचाली वेग आला आहे.भाजपाकडून अनेक जण इच्छुक आहे भाजपच्या सर्वेक्षण मध्ये ज्याचे नाव समोर येईल त्यालाच उमेदवारी दिली जाईल असे सांगण्यात येते मात्र कॉग्रेसची परंपरा वेगळी आहे……
कॉग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी खासदार वासनिक निर्णय घेणार की जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोद्रे या बाबद सम्रभं व्यक्त केला जात आहे.
चिखली नगरपालिकेवर मागील पाच वर्षे सोडले तर पूर्वीपासूनच काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. तत्कालीन आमदार रेखाताई खेडेकर यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातही नगरपालिकेवर काँग्रेसचाच ताबा होता. त्यामुळे काँग्रेसमध्ये इच्छुकांची रांग लागलेली आहे.
सध्या उमेदवारांच्या चर्चेत हिरकणी महिला अर्बन पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. वृषाली राहुल बोंद्रे यांचे नाव आघाडीवर आहे. त्या माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या पत्नी असून, राजकारणाचा थेट अनुभव नसला तरी त्यांनी प्रत्येक निवडणुकीत राहुलभाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे.
हिरकणी प्रतिष्ठान आणि पतसंस्थेमार्फत त्या चिखलीतील नागरिकांशी सातत्याने जोडलेल्या आहेत. शांत, संयमी स्वभाव आणि महिलांशी आपुलकीचे संबंध ही त्यांची जमेची बाजू मानली जाते.
दुसऱ्या क्रमांकावर माजी उपनगराध्यक्ष कुणाल सुभाष बोंद्रे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष असा अनुभव असून, त्यांच्या पत्नी सौ. प्रियाताई कुणाल बोंद्रे या नगराध्यक्ष राहिल्या आहेत. कुणाल बोंद्रे यांचा युवकांमध्ये मोठा प्रभाव आहे. एकता गणेश मंडळ, तुळजाभवानी उत्सव मंडळ आणि विवेकानंद पतसंस्था यांच्या माध्यमातून त्यांनी चिखलीत चांगली पकड मिळवली आहे. तसेच त्यांचे काका काशिनाथ बोंद्रे हे बाजार समितीचे माजी संचालक असल्याने त्यांचा प्रभावही मोठा मानला जातो.
याचबरोबर प्रा. निलेश गावंडे हे देखील काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी नगरपालिकेतील विविध पदांवर काम केले असून, ते गेली अनेक वर्षे राजकारणात सक्रिय आहेत. समाजात नेतृत्व करणारे, शिक्षणतज्ज्ञ आणि मराठा समाजाचे बळ म्हणून त्यांची ओळख आहे.शिक्षण क्षेत्रात त्यांची चांगली पकड आहे त्याचा विविध पक्षात मोठा मित्रपरिवार आहे
तसेच दिपक देशमाने.. मुंगसाजी महाराज पतसंस्था अध्यक व सरस्वती नर्सिंग कॉलेज — हे देखील काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ते राहुलभाऊ बोंद्रे यांचे निकटवर्तीय आणि निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी नगरसेवक म्हणून त्यांनी चांगला अनुभव घेतला आहे. मागील निवडणुकीत थोडक्यात नगराध्यक्षपद हुकले असले तरी ते आजही कार्यरत आहेत.
एकंदरीत काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच रंगली असून, या सगळ्यांत राहुल बोंद्रे यांच्या मनात नेमकं कोणाचं नाव आहे याची उत्सुकता चिखलीकरांमध्ये वाढली आहे का थेट दिल्ली गाठून खा वासनिकाकडून नगराध्यक्षपदाचे तिकीट आणण्यात यशस्वी कोण होतो हे येणारा काळच ठरवणार आहे त्या मुळे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे येणारा काळच ठरवेल!
















