बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) -फडणवीस सरकारने जाहीर केलेले विशेष कृषी पॅकेज हे “तोडके व अपुरे” असल्याचा आरोप करत आज बुलडाणा जिल्ह्यात स्व. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना आक्रमक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या पॅकेजच्या शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करून शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते एकनाथ पाटील थुट्टे, देविदास कणकर, समाधान कणकर, विनायक वाघ, ज्ञानेश्वर खरात यांनी केले. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांना निवेदन देऊन शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याचा निषेध नोंदवला आहे.
माहे जुन ते सप्टेंबर २०२५ मधे राज्यात अतिवृष्टी व पुर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक :- ०९ ऑक्टोबर,२०२५ ला
“शासन निर्णय क्रमांक : सीएलएस – २०२५ /प्र.क्र.३६५/म-३(मदत १)” प्रकाशित केला परंतु हा केवळ “शेतकऱ्यांशी आकड्यांचा खेळ आणि फसवणूक आहे .
फडणवीस सरकारच्या कथित ‘मदत पॅकेज व सवलती’ चा आम्ही शेतकरी व शेतकरी संघटना तीव्र निषेध करते.
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व पूरपरिस्थितीने कोट्यावधी शेतकरी कुटुंबिय वित्तीय अडचणीत आले आहेत.बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा सर्वत्र शेतीपीकांचे माहे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी व ढगफुटीमुळे शेतीपीक शेतकऱ्यांच्या हातचे गेले आहे.
या भीषण पार्श्वभूमीवर सरकारने नुकतेच “३१६२८ कोटींचे ऐतिहासिक मदत पॅकेज” जाहीर केले , पण हि घोषणा म्हणजे “मदत” नव्हे तर शेतकऱ्यांचा उपहास करणारी आहे. कारण
सरकारी आकड्यांतील बेईमानी —
- कोरडवाहू पिकांसाठी मदत फक्त ₹८५०० प्रति हेक्टर (म्हणजे ₹३४०० प्रति एकर) करण्यात आली आहे,
तर मागील वर्षी ती ₹१३,६०० प्रति हेक्टर होती — म्हणजे ₹५१०० ने कपात. - बागायती पिकांसाठी मागील वर्षी ₹३६,०००, यावर्षी फक्त ₹३२,५०० — ₹३५०० ने कपात.
- विहिरी दुरुस्तीची मदत २०१८ मध्ये ₹१,००,००० होती; आता ती फक्त ₹३०,०००.
- जमिनी खरवडल्यावरची माती टाकण्याची मदत, रोजगार हमी योजनेच्या आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या तरतूदीप्रमाणे आहे यामध्ये काही नवीन नाही.फडणवीस सरकारने जाहीर केलेले हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा शासन निर्णय आहे.त्यामुळे
हे “ऐतिहासिक” नसून शेतकऱ्यांमध्ये चिड निर्माण करणारे असल्याने आज शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासन निर्णयाची होळी करीत करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ₹५०,००० प्रति एकर म्हणजेच (₹१५००००/-प्रती हेक्टर) ही रक्कम मदत म्हणून नव्हे तर लुटिच्या परतफेडीची किस्त म्हणून देण्यात यावी,यासह विविध शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले आहे.आजचे आंदोलन हे शांततेच्या मार्गाने करण्यात आले असून मागण्यांची दखल घेऊन मागण्या पुर्ण न झाल्यास यापेक्षा आंदोलन तिव्र करण्यात येईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना एकनाथ पाटील नामदेवराव जाधव समाधान कणखर दामोदर शर्मा मुरली महाराज येवले विलास मुजमुले राजू शेटे देविदास भगत विठ्ठल सोळंकी सुखदेव नरोटे हरिदास खांदेबराड दिलीप सिंग राजपूत अंबादास चिंचोली खुशालराव कणखर नंदकिशोर भगत कलीम शेठ जमादार अचितराव थुटे दत्तात्रय कणखर तेजराव मुंडे असे असंख्य शेतकरी हजर होते, व शेतकरी यांनी दिला आहे यावेळी आंदोलनात…
















