संतापजनक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला लावलं ॲसिड; गर्भवती महिला ओरडू लागल्याने… भोकरदन मधील प्रकार!

संतापजनक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला लावलं ॲसिड; गर्भवती महिला ओरडू लागल्याने... भोकरदन मधील प्रकार!

भोकरदन/जालना कव्हरेज न्यूज: जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील सरकारी ग्रामीण रुग्णालयात एक संतापजनक घटना घडली आहे. प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेच्या पोटावर सोनोग्राफीदरम्यान मेडिकल जेलऐवजी चुकून हायड्रोक्लोरिक ॲसिड लावण्यात आले. या घटनेमुळे महिलेच्या पोटाला गंभीर जखमा झाल्या असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (२७ जून २०२५) सकाळी घडली.

खापरखेडा गावातील शीला संदीप भालेराव या गर्भवती महिला प्रसूतीसाठी भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. प्रसूतीपूर्वी सोनोग्राफी करताना बाळाचे ठोके तपासण्यासाठी लागणाऱ्या मेडिकल जेलऐवजी एका नर्सने चुकून हायड्रोक्लोरिक ॲसिड त्यांच्या पोटावर लावले. यामुळे शीला यांच्या पोटाला आणि संवेदनशील भागाला जखमा झाल्या. ॲसिडमुळे त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका निर्माण झाला आहे. तरीही, या गंभीर चुकांनंतर शीला यांनी अर्ध्या तासात एका निरोगी बाळाला जन्म दिला. बाळ पूर्णपणे सुखरूप असून आवश्यक उपचार चालू आहेत.

“स्वार्थी असतो तर करोडोत खेळलो असतो” – मनोज जरांगे पाटील; २९ जूनला अंतरवालीत मराठा आरक्षणासाठी बैठक

रुग्णालयातील सूत्रांनुसार, एका स्वच्छता कर्मचाऱ्याने साफसफाईसाठी वापरले जाणारे हायड्रोक्लोरिक ॲसिड चुकून औषधांच्या ट्रेमध्ये ठेवले होते. यामुळे नर्सने ते मेडिकल जेल समजून वापरले. ऍसिड लावल्यानंतर शीला यांना तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि त्या ओरडू लागल्या. यानंतर त्यांच्या नातेवाइकांनी नर्सला विचारणा केली असता, नर्सने त्यांच्यावरच आरडाओरड केली आणि काही काळ रुग्णालयातून बाहेर पडली, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

Magel Tyala Saur Krushi Pump Yojana: मागेल त्याला सौर कृषी पंप योजना; शेतकऱ्यांसाठी स्वावलंबी आणि शाश्वत सिंचनाचा मार्ग

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर. एस. पाटील यांनी या प्रकरणाला गंभीर निष्काळजीपणाचे प्रकरण संबोधले. “ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. रुग्णालयातील औषध व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजात गंभीर त्रुटी आढळली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

शीला यांच्यावर सध्या भोकरदन ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

1 thought on “संतापजनक! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेच्या पोटाला लावलं ॲसिड; गर्भवती महिला ओरडू लागल्याने… भोकरदन मधील प्रकार!”

Leave a Comment

WhatsApp Join Group!