भाजप – शिंदे गटाची महायुती बुलडाण्यात फिस्कटली…!

अमरावतीच्या भाजपच्या सभेमुळे स्वबळ निश्चित गट, गण व पालिकेच्या आरक्षणानंतर राजकीय उलथापालथ होणार….!

बुलडाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज) नगर पालिकेचे अध्यक्षपदासह सदस्य गणांचे आरक्षण जाहीर होत नाही तोच आज जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचे आरक्षणही जाहीर झाले आहे. याच दरम्यान अमरावती येथे भाजपचा आढावा बैठक झाली. ही बैठक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवुनच घेण्यात आल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप वाढविण्यासाठी शक्य तिथे युती करा, नाहीतर स्वबळावर लढा असे सांगत स्थानिक नेत्यांच्या हाती निर्णय सोपविला. त्यामुळे आता बुलडाण्यात भाजप- शिंदे गटाची युती होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपने घाटावर व घाटाखाली अशी दोन अध्यक्षपदे दिली आहे. या भागाचे समीकरण जुळत नसल्याने भाजपने पक्ष वाढीसाठी उचलले हे पाऊल निर्णायक ठरत असून

तयारी दोन्ही पक्षांची…!

भाजप व शिंदे गटाने आपआपली तयारी सुरु केली आहे. भाजप पक्षाच्या आदेशानुसार एक एक कार्यक्रम हाती घेत आहे. शिंदे गट भुमीपुजन करुन विकास दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपने मतदार यादीवर आक्षेप, नगर पालिका प्रभाग रचनेवर आक्षेप घेऊन आपला पवित्रा मतदान वाढीवर केंद्रीत केला आहे.

घाटावर कमजोर पडलेली भाजप आता कात टाकत आहे. घाटावर बुलडाणा व मेहकर येथे शिंदे गटाचे आमदार व खासदार आहे. त्यामुळे शिंदे गटाची ताकद कमी करण्यासाठी व कार्यकर्ते मित्राचे दारात गेल्या पेक्षा आपणच त्यांना निवडणुकीत ताकद पुरवण्याची संधी भाजप देत आहे. जिल्हयातील भाजपचे आमदार व पक्षाचे नेते यांनी ही ताकद जोपासत कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुक स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा आजच्या अमरावतीच्या बैठकीनंतर सत्यात उतरण्याची तयारी आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment