छत्रपती संभाजीनगर (बुलडाणा कव्हरेज नेटवर्क): अंगावर काटा आणणारी, काळीज हेलावून टाकणारी अशी घटना पुंडलिकनगर परिसरात गुरुवारी (२८ ऑगस्ट) पहाटे समोर आली. पतीपासून वेगळी राहणाऱ्या २४ वर्षीय तरुणीने अनैतिक संबंधातून जन्मलेल्या बाळाला गोणीत टाकून कचऱ्यात फेकून दिले. दोन कुत्र्यांनी ती गोणी ओढली, ती गोणी एका बसखालीही गेली, पण देवाच्या कृपेने बाळाचे प्राण वाचले. बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकून एका सतर्क नागरिकाने धाव घेतल्याने आज बाळ सुरक्षित आहे.
मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी
घटनाक्रम असा…
गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास भाग्येश पुसदेकर हे कामावरून घरी परतत होते. मुथूट फायनान्स कार्यालयाजवळून जाताना त्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्यातील गोणीतून बाळ रडण्याचा आवाज ऐकू आला. ती गोणी कुत्र्यांनी ओढत होती. त्यांनी तत्काळ आरडाओरडा करून लोकांना बोलावले. गोणी उघडली असता आत रक्तबंबाळ नवजात बाळ दिसले.
क्षणभर गावकऱ्यांचा हृदयाचा ठोका चुकला. पण जवळच्या आजींनी लगेचच चादर आणून बाळाला गुंडाळले आणि त्याला रुग्णालयात नेण्यात आले. खासगी रुग्णालयाने उपचारास नकार दिल्याने बाळाला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, “बाळाचे वजन चांगले आहे, अंगावर जखमा आहेत, पण ते सध्या पूर्णपणे सुरक्षित आहे. २-३ दिवसांत ते बरे होईल.”
Babydoll Archi की सच्ची कहानी, उम्र, वायरल वीडियो और गहरा विवाद जो सबको चौंका देगा
पोलिसांनी असे उघड केले सत्य!
या घटनेनंतर पुंडलिकनगर पोलिसांनी चौकशी सुरू केली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३.३० वाजता एका तरुणीने बाळाची गोणी फेकल्याचे स्पष्ट दिसले. कपडे आणि उंच टाचेच्या सँडलवरून पोलिसांनी संशयित तरुणीला हेरले आणि तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली.
२४ वर्षीय ही तरुणी मूळची वाशिमची असून, पतीपासून दीड वर्षांपूर्वी विभक्त झाली होती. सध्या ती पुंडलिकनगरात भाड्याने राहत होती व खासगी कंपनीत काम करत होती. तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध होते. त्यातून ती प्रेग्नंट झाली. बाळाचा जन्म गुप्त ठेवण्यासाठी तिने खोलीतच प्रसूती केली आणि बाळ कचऱ्यात टाकल्याचे कबूल केले.
देव तारी त्याला कोण मारी!
क्रूर मातेच्या या कृत्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मात्र बाळाचे नशीब फार बलवत्तर ठरले. गोणी कुत्र्यांनी फाडली, बसच्या चाकांमध्ये गेली… तरीही बाळ सुरक्षित राहिले. देवाच्या कृपेने व नागरिकांच्या सतर्कतेमुळे आज ते जिवंत आहे. पोलिसांनी या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.














1 thought on “काळजाला भिडणारी स्टोरी…! “देव तारी त्याला कोण मारी!” नवजात बाळाला आईने कचऱ्यात टाकले; कुत्र्यांनी ओढले, बसखाली आले”