“…..तर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही!” – शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा एल्गार! येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबद्दल तुपकर काय म्हणाले….

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) –”शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज शेगाव येथील भव्य एल्गार मेळाव्यातून दिला. संत नगरीत हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्यात तुपकरांनी सरकारच्या कृषी धोरणांवर तीव्र टीका केली.

शेतकऱ्यांनी केले रविकांत तुपकर यांचे जंगी स्वागत ..

बैलगाडीतून मिरवणूक!रविकांत तुपकर शेगावात दाखल होताच त्यांचे शेतकऱ्यांनी बैलगाडीतून जल्लोषात स्वागत केले. बैलगाडीतूनच शहरातून मिरवणूक काढण्यात आली. स्वतः तुपकर यांनी बैलगाडी चालवत ‘धुरकरी’ भूमिका पार पाडली. रस्त्यावर शेतकरी, व्यापारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सरकारवर जोरदार हल्लाबोल...

तुपकर म्हणाले, “सोयाबीन, कापूस, कांदा यांना भाव नाही. उसाचा प्रश्न गंभीर आहे. शेतकऱ्यांकडे पीककर्ज नाही, कर्जमाफी नाही. पावसाळा जवळ आला तरी पेरणीसाठी काहीही ठोस नाही. शेतकरी संकटात असताना सरकार केवळ गप्प बसले आहे.”तसेच, “मी गेल्या २२ वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी झगडतोय. लोकसभेत अपक्ष उमेदवार असूनही अडीच लाख मते मिळवली, ही जनतेची माझ्यावरची श्रद्धा आहे,” असे त्यांनी ठासून सांगितले.

पीकविमा मंजुरीचे श्रेय आंदोलनाला..

“आमच्या सातत्यपूर्ण संघर्षामुळेच बुलडाणा जिल्ह्यास २०२३ साठी ५०० कोटी आणि २०२४ साठी ६५० कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला. हे यश फक्त आंदोलना मुळे मिळाले,” असे त्यांनी सांगितले.

सरसकट कर्जमाफीची मागणी!

तुपकरांनी सांगितले की, “सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले नाही. त्यामुळे बँका आता शेतकऱ्यांवर वसुलीचा तगादा लावत आहेत. ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे की, त्वरित सरसकट कर्जमाफी जाहीर करावी.”

मागण्यांची यादी – लढ्याची तयारी!

ज्यांना पीकविमा मिळालेला नाही, त्यांना तात्काळ विमा दिला जावासोयाबीन व कापसाला ₹३,००० प्रतिक्विंटल भाव फरक दिला जावा

जंगली जनावरांमुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी ठोस उपाययोजना

शेतमजुरांसाठी विमा संरक्षण

जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदलासत्ताधाऱ्यांवर सवालांची सरबत्ती..

“आरोग्यमंत्री असूनही जिल्ह्यातील केस-नख गळतीवर अजूनही संशोधन नाही. जे पंतप्रधानाचे जवळचे आहेत, त्यांनी कधी कर्जमाफी किंवा पीकविमा यावर का बोलत नाही?” असा थेट सवालही तुपकरांनी उपस्थित केला.

“जो कर्जमाफीची भाषा करेल, तोच सत्तेत येईल!”

येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत “जो कर्जमाफी बोलेल, तोच राज करेल” हा नारा गावोगावी पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी केले.उपस्थित मान्यवर आणि जनसमुदाय..या मेळाव्यास वासूदेव उन्हाळे, आर. बी. देशमुख, राजू शेळके, संतोष खेर्डे, गजानन देशमुख यांच्यासह हजारो शेतकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment