जालना (जालना कव्हरेज न्यूज): जालन्यातील जाफराबाद तालुक्यात सकाळी एक धक्कादायक घटना घडली ज्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. भोकरदन तालुक्यातील कोपरडा गावातून सुलतानपूरकडे रुग्णाला उपचारासाठी घेऊन निघालेली कार राजूर-जाफराबाद मार्गावरील गाडेगव्हाण फाट्याजवळ भरधाव वेगात असताना नियंत्रण सुटून थेट ७० फूट खोल विहिरीत कोसळली. या अपघातात कारमधील पाचही जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
मनोज जरांगे पाटील का जीवन परिचय; मराठा आरक्षण के “संघर्ष योद्धा” की संघर्षपूर्ण कहानी
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना आज सकाळी ५ ते ६ वाजण्याच्या दरम्यान घडली. कार चालकाचा वेग जास्त असल्याने रस्त्याच्या कडेला सकाळच्या फिरण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला धडक बसली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील ताबा सुटला आणि कार विहिरीच्या भिंतीला तोडून आत पडली. विहिरीत सुमारे ६० फूट पाणी असल्याने कार पूर्णपणे बुडाली आणि त्यातील सर्व प्रवासी गुदमरून मरण पावले. हे पाहून स्थानिक रहिवाशी आणि शेतकरी धावले, पण गाडी पाण्यात गेल्याने त्यांना तातडीने मदत करता आली नाही.
1.40 लाख पगारासह 248 जागांसाठी भरती, 2 सप्टेंबरपासून अर्ज करण्यास सुरुवात
घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिस आणि भोकरदन अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. स्थानिकांच्या मदतीने विहिरीतील पाणी उपसून मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातात ज्ञानेश्वर डकले, पद्माबाई भांबिरे, निर्मलाबाई डकले, आदिनाथ भांबिरे आणि ज्ञानेश्वर भांबिरे या पाच जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्व नातेवाईक होते आणि एका रुग्णाला मदत करण्यासाठी निघाले होते, पण नियतीने त्यांच्यावर असा क्रूर खेळ खेळला की संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या घटनेने गाडेगव्हाण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांनी या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू केली आहे. रस्त्यावरील वेग नियंत्रण आणि सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याची गरज या अपघाताने पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे.