कल्याण मोहने येथील पोलीस चौकी परिसरात फटाक्याचे स्टॉलवर लहुजी नगर येथील दोन तरुण फटाके घेण्यासाठी गेले होते फटाक्याच्या देण्याघेण्यावरून वाद सुरू हा रात्री 9 च्या सुमारास झाला आपापसात झालेला वाद मिटला. मात्र मोहने येथील स्थानीक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजी नगरमध्ये जाऊन घराची तोडफोड केली महिलांना मारहाण केली घरांवर दगडफेक केली या दगडफेकीत ९ ते १० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे
घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र शेकडो गुंडांनी पोलिसांसमोर दगडफेक करत घरांची तोडफोड करून महिलांना मारहाण केली.
विशेष म्हणजे या सर्व गावगुंडांना संध्या साठे ही तरुणी वस्तीवर हल्ला करणाऱ्या गावगुंडांना अडवण्याचा प्रयत्न करत होती एवढा गुंडांना एक तरुणी प्रतिकार करत असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी लहुजी नगर मधील काही तरुणांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गावगुंडांवर गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप संध्या साठे यांनी केला आहे.







