मेरा खुर्द मध्ये भाजपला मोठा धक्का..! भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता विष्णु गाडेकर यांनी अखेर रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली तालुक्यातील मुरादपूर येथील विष्णु गाडेकर हे गेल्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यपद्धतीवर नाराज होते. त्यांनी बुलडाणा कव्हरेजशी संपर्क साधून आपली नाराजी स्पष्ट केली होती. दीर्घकाळ भाजपमध्ये निष्ठेने कार्य केलेल्या गाडेकर यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला आहे.काल त्यांनी काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला.

Government Investment schemes: फक्त 500 रुपये गुंतवणूक करा, आणि मिळवा 3 लाख रुपये

गाडेकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे.गाडेकर हे सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून, त्यांचा कार्यकर्त्यांमध्ये चांगला संपर्क आणि प्रभाव आहे. त्यामुळे त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश हा पक्षासाठी बळकटी देणारा ठरेल, असे मत काँग्रेसच्या गोटात व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment