जिल्ह्यात नगर पालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर .. कही खुशी कही गम…! चिखली, मेहकर ‘ओपन’साठी; बुलढाणा…!

बुलडाणा (उद्धव पाटील थुट्टे :बुलडाणा कव्हरेज न्यूज ): राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदांचे आरक्षण अखेर जाहीर करण्यात आले आहे. एकूण १४७ नगरपंचायती आणि २४७ नगरपालिकांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, त्यापैकी ३४ नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद ओबीसी महिलांसाठी तर १७ पदे अनुसूचित जातींसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.

. ….जाहिरात ☝️

बुलडाणा जिल्ह्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण खालीलप्रमाणे जाहीर झाले आहे :

🔹 देऊळगावराजा – अनुसूचित जाती (महिला)
🔹 चिखली – खुला प्रवर्ग
🔹 मेहकर – खुला प्रवर्ग
🔹 बुलडाणा – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 खामगाव – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 नांदुरा – खुला प्रवर्ग (महिला)
🔹 शेगाव – खुला प्रवर्ग (महिला)

या आरक्षणामुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. विशेषतः बुलडाणा, शेगाव, नांदुरा आणि खामगाव या नगरपरिषदांमध्ये महिलांसाठी खुल्या प्रवर्गातील आरक्षणामुळे राजकीय चित्रात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment