केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टरचे सारथी; शेतकऱ्यांचा अनोखा ट्रॅक्टर पोळा…

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव झाले ट्रॅक्टरचे सारथी; शेतकऱ्यांचा अनोखा ट्रॅक्टर पोळा…

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) :राज्यात सर्वत्र बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा होत असताना मेहकरमध्ये एक आगळावेगळा उपक्रम पाहायला मिळाला. येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पोळा साजरा करत शेतीतील ट्रॅक्टरच्या योगदानाला सलाम केला.या खास सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव स्वतः ट्रॅक्टरचे चालक बनून सहभागी झाले. गेल्या काही वर्षांपासून मेहकरमधील हा ट्रॅक्टर पोळा विशेष आकर्षण ठरत आहे.पारंपरिकरित्या बैलपोळा हा सण बैलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो.

मात्र, आजच्या आधुनिक शेतीत बहुतांश कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली जातात. त्यामुळे बैलांसोबत ट्रॅक्टरलाही मान मिळावा, या उद्देशाने मेहकर येथे हा ट्रॅक्टर पोळा आयोजित करण्यात आला.शहरातील मुख्य मार्गावर निघालेल्या मिरवणुकीत १५० ते २०० ट्रॅक्टर सहभागी झाले. वर्षभर शेतीत राबणाऱ्या या आधुनिक सर्जा-राजांनाही यावेळी सणाचा आनंद मिळाला.

या अनोख्या ट्रॅक्टर पोळ्यात केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, माजी आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपल्या ट्रॅक्टरसह सहभागी झाले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment