सिल्लोड (जालना कव्हरेज न्युज): सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद गावात एका साडेचार वर्षीय मुलाचा शेतातील पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली. ही घटना ४ जुलै २०२५ रोजी घडली. मृत बालकाचे नाव कार्तिक भगवान मोरे आहे.
रहिमाबाद येथील शेतात कार्तिकची आई कोमल मोरे मिरच्या तोडण्याचे काम करत होत्या. त्यांच्यासोबत कार्तिकही शेतात गेला होता. कोमल कामात व्यस्त असताना कार्तिक शेतातील हौदाच्या आसपास खेळत होता. खेळताना तो अचानक हौदात पडला आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
करडी गावात हृदयद्रावक घटना; ८ वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेत अचानक मृत्यू
घटना लक्षात येताच कार्तिकचे काका गजानन मोरे यांनी त्याला तातडीने सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणाची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, सध्या अधिक तपशील उपलब्ध नाही.