मुंबई/ जालना कव्हरेज न्यूज:राज्यातील सुमारे १ कोटी २९ लाख शेतकऱ्यांपैकी तब्बल २० लाख ३७ हजार २१० शेतकरी बँकांच्या कर्जाच्या थकबाकीमुळे अडचणीत आहेत. या शेतकऱ्यांकडे बँकांचे एकूण ३१ हजार २५४ कोटी रुपयांचे कर्ज थकलेले आहे, अशी माहिती राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या अहवालातून समोर आली आहे.
विधानसभा निवडणुकीदरम्यान विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. या आश्वासनामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीच्या आशेवर थकबाकी भरणे टाळत आहेत. परिणामी, बँकांनी या शेतकऱ्यांना नवीन कर्ज देणे बंद केले आहे, ज्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
या संकटाला नैसर्गिक आपत्ती आणि शेतीला मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधांचाही मोठा वाटा आहे. मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिकांचे नुकसान, उसाला एकरकमी एफआरपी (फेअर अँड रेम्युनरेटिव्ह प्राइस) मिळण्यात अडचणी, पिकांना हमीभावाचा अभाव, अतिवृष्टी आणि महापूर यांसारख्या समस्यांमुळे शेतकरी कर्जाची परतफेड करू शकलेले नाहीत. यामुळे थकबाकी वाढतच चालली आहे.
विशेषतः बीड, जालना, बुलढाणा, नांदेड, परभणी आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये दीड लाख ते सव्वादोन लाख शेतकरी थकबाकीदार आहेत.
3 thoughts on “राज्यातील २० लाख शेतकऱ्यांसाठी बॅंकांचे दरवाजे बंद; ३१ हजार कोटींची थकबाकी; ‘या’ १५ जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी; शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा”