रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं थेट तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण: “आम्हाला शाळेसाठी रास्ता द्या” म्हणत मुलांचाही सहभाग

रस्त्यासाठी शेतकऱ्यांचं थेट तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण: "आम्हाला शाळेसाठी रास्ता द्या" म्हणत मुलांचाही सहभाग

येवता/जालना कव्हरेज न्यूज: गावातील शेतकऱ्यांनी रस्ता बंदच्या समस्येमुळे अखेर हतबल होऊन तहसिल कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे. गट क्रमांक ३३ मधील वहीवाटीचा रस्ता २०२३ पासून वेनुबाई अंबादास ससोदे यांनी अडवल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. या रस्त्यावरून शेतकरी आपल्या शेतात आणि घरात ये-जा करतात, तर लहान मुलं शाळेत जाण्यासाठी आणि वयोवृद्धांचं औषधपाणी आणण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात. रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांसह गावकऱ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.

“पप्पी दे” असे म्हणत ७३ वर्षीय म्हाताऱ्याने क्लिनिकमध्ये जाऊन २७ वर्षाच्या रिसेप्शनिस्ट ला एकट पाहून लावला गालाला हात…

या प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांपैकी अजंदर आणि दगडू तोताराम सिरसाट यांनी सांगितलं, “आम्ही तहसिलदारांकडे तक्रार केली होती. १५ मे २०२४ रोजी त्यांनी आमच्या बाजूने आदेशही दिला. पण त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. ९ जून, १८ जून आणि २० जून रोजी महसूल आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शिवारात जाऊन पंचनामा केला, पण रस्ता अजूनही बंदच आहे.”

मायलेकींना यातनागृहात डांबून ठेऊन तो करत होता अमानुष अत्याचार; भोंदू बाबाचा अघोरी कृत्याचा पर्दाफाश

या आंदोलनात शाळकरी मुलांचाही सहभाग लक्षणीय आहे. हातात फलक घेऊन लहान मुलं रडवेल्या आवाजात ओरडत आहेत, “आम्हाला शाळेत जायचंय… रस्ता द्या!” त्यांचा हा आक्रोश उपस्थितांच्या मनाला चटका लावणारा आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. “सरकार आमच्यासाठी आदेश काढतं, पण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. आम्हाला न्याय कुठे मिळणार?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

तहसिलदारांनी ७ जुलै २०२५ पर्यंत रस्ता मोकळा करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण ती मुदत उलटूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “रस्ता खुला झाला नाही, तर हे आंदोलन तहसिल कार्यालयापासून थेट जिल्हा स्तरावर नेऊ!”

संतापजनक: मुलीच्या छेडछाडीला विरोध करणाऱ्या वडिलांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण, दोन आरोपी अटकेत

हा रस्ता बंदचा प्रकार केवळ अन्याय नाही, तर शेतकऱ्यांच्या जगण्याचा अधिकारच हिरावून घेण्यासारखा आहे. येवता गावातील शेतकऱ्यांचा हा लढा आता तीव्र होत चालला आहे. प्रशासनाने तातडीने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी गावकरी आणि आंदोलकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
WhatsApp Join Group!