EXCLUSIVE : जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!

जुन्या जिल्हा परिषद-पंचायत समिती सदस्यांना जनता विसरली?

जिल्हा परिषद निवडणूकीचे वारे शेळगाव आटोळ भोवती घोगांवते! केळवद-मेरा बुद्रुक आरक्षणाच्या चर्चेत उमेदवारांची धडपड ; शेळगाव-आटोळ सर्कलकडे सगळ्यांचा डोळा!*

चिखली (उध्दव थुट्टे पाटील – बुलडाणा कव्हरेज न्युज)जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत होणार असल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.या सोडतीमध्ये केळवद आणि मेरा बुद्रुक ह्या दोन जिल्हापरिषद सर्कल एससी साठी राखीव ठेवण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा चिखलीच्या राजकारणात रंगत असून मेरा बुद्रुक आणि केळवद या सर्कल मध्ये जोरदार तयारी केलेल्यानी आता शेळगाव आटोळ मध्ये चाचपणी सुरू केली आहे.

        केळवद जिल्हा परिषद सर्कल आणि मेरा बुद्रुक सर्कल या दोन महत्वाच्या ठिकाणी भावी उमेदवारांनी आत्तापासूनच जोरदार तयारी सुरू केली होती.आरोग्य शिबीर,वाढदिवस,कीर्तन अशा गर्दी खेचणारे  कार्यक्रमाची रेलचेल सुरू असताना कुणीतरी बातमी पसरवली की मेरा आणि केळवद सर्कल एससी साठी आरक्षीत ठेवले जाणार !

एकाच दिवसात सगळं बदललं वाढदिवसावर,आणि शिबिरावर होणारा खर्च थांबवला गेला.याउपर
आरक्षण सोडतीचा काय निकाल लागतो, हेच त्यांच्या राजकीय भवितव्याला दिशा देणारे ठरणार आहे.

जर या दोन्ही सर्कलमध्ये आरक्षण लागून उमेदवारी मर्यादित झाली, तर बहुतांश उमेदवारांची नजर शेळगाव-आटोळ सर्कलकडे वळण्याची शक्यता आहे. या सर्कलवर अनेक दिग्गजांचे गुप्त पथक आधीच तयारीला लागले आहे.ते गावोगावी जाऊन भेटी गाठी गेट आहे कुणी नाते तर कुणी जातीचे समीकरणे लावत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment