EXCLUSIVE : शेळगाव आटोळ सर्कलमध्ये रणधुमाळीची चाहूल!  भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे  नेते रिंगणात उतरण्याच्या तयारीत; “पत्नी विरुद्ध पत्नी” अशी लढत रंगणार!

शेळगाव आटोळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) —
आरक्षण सोडत निघाल्यानंतर शेळगाव आटोळ सर्कलमध्ये एक वेगळीच राजकीय लगबग पाहायला मिळत आहे. अनेकांना आधी माहीत नव्हतं, पण आज झालेल्या आरक्षणामुळे “महायुती आणि महाविकास आघाडी” दोन्हींत गोंधळ झालाय. त्यामुळे या सर्कलमध्ये जर-तरचे राजकारण शिगेला पोहोचलं आहे.

सध्या सर्कलमध्ये भाजपचे माजी उपतालुका अध्यक्ष विष्णु घुबे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील, भाजप जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ, शिवसेना (शिंदे गट) युवा सेना उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हा सरचिटणीस डॉ. विकास मिसाळ, आणि कमी वयात सर्वाधिक पदे भूषवणारे कृष्णा मिसाळ हे सर्वजण मतदारसंघात जनसंपर्क मोहिमेला लागले आहेत.

दरम्यान, स्व. शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही, त्यामुळे समीकरणं अजून ढवळून निघालेली आहेत.

आरक्षणानुसार शेळगाव आटोळ सर्कलमध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) हा गट सुटल्याने आता सरपंचपदावर आणि ग्रामपंचायत सदस्य पद आधी अनुभव घेतलेल्या महिला नेत्यांना पुन्हा संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक “राजकीय बायका” रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत.

भाजपकडून युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष काळे पाटील यांच्या पत्नी, माजी उपतालुका अध्यक्ष विष्णु घुबे यांच्या पत्नी तसेच जिल्हा सचिव कृष्णा सपकाळ यांच्या पत्नी रिंगणात उतरतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

घुबे यांनी गेल्या काही वर्षांत दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून वेगळी छाप सोडली आहे, त्यामुळे त्यांचा प्रभाव स्थानिक पातळीवर ठसठशीत आहे.

कमी वयात पत्रकार क्षेत्रात प्रवेश करून देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना त्याचे जिल्हा अध्यक्ष पद आणि राष्ट्रीय स्वयं संघात काम करत असलेल्या कृष्णा सपकाळ हे सुद्धा त्यांची पत्नी रिंगणात उतरवणार अशी शक्यता दिसते!

तर संतोष भुतेकर यांच्या आंदोलनामुळे त्यांची ओळख “आंदोलन सम्राट” म्हणून झाली असून त्यांच्या पत्नीला पाच वर्षांचा सरपंचपदाचा अनुभव असल्याने त्या देखील रिंगणात उतरणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॉ. विकास मिसाळ आणि कृष्णा मिसाळ हे  दोघे बंधू आपापल्या पत्नींना उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याचे समजते.

कृष्णा मिसाळ यांची पत्नी शेळगाव आटोळ ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेली आहे आणि कृष्णा मिसाळ हे कमी वयात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तसेच पक्षाचे तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत.आता प्रचारात सुद्धा आघाडी घेतली आहे. पक्षाचा माध्यमातून पक्ष संघटन मजबूत केले आहे…

आता या सगळ्या समीकरणांमुळे शेळगाव आटोळ सर्कलमध्ये “पत्नी विरुद्ध पत्नी” अशी लढत रंगण्याची शक्यता प्रबळ आहे.

स्थानिक राजकारणात महिलांची मजबूत एंट्री झाल्याने या सर्कलमधील निवडणूक रोमांचक आणि थरारक होणार हे निश्चित!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment